आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:पहिल्या दिवशी पंधराशे जणांचे झाले लसीकरण; हर घर दस्तक टप्पा दोन सुरू, अल्प प्रतिसाद

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढण्यासाठी जिल्ह्यात १ जूनपासून हर घर दस्तक टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १ हजार ५१३ जणांचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात दुसरा डोस आणि बुष्टर डोस घेणाऱ्यांची संख्या पहिल्या डोसच्या तुलनेत अधिक होती.

जिल्ह्यात १२ वर्षापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. मार्च महिन्यापासून लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. त्यातच शाळांना सुट्या जाहीर झाल्यानंतर गती अधिक धिमे झालेली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा पहिला डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोसचा कालावधी देखील उलटला आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत पहिला डोस घेतला नाही. त्यांचा शोध घेत त्यांना पहिला डोस देण्यासह ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे.

त्यांना दुसरा डोस देता यावा या उद्देशाने हर घर दस्तक टप्पा दोन मोहीम १ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी जिल्ह्यात १ हजार ५१३ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे आता जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या ११ लाख ८७ हजार २११ एवढी झाली आहे. तर पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १४ लाख ७८ हजार २७३ एवढी झाली आहे.जिल्ह्यात तब्बल दोन लाख एक हजार ६२ जणांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.तर चार लाख १९ हजार ४०४ जणांनी अद्याप लसच घेतलेली नाही. हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत अशा नागरीकांचा शोध घेत त्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आता पर्यंत ३० हजार १८७ जणांनी बुष्टर डोस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...