आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री विलेपार्ले केळवाणी मंडळ संचलित एसव्हीकेएम सीबीएसई स्कूल मध्ये प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातर्फे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धेत जिंकण्यासाठी चुरस दिसून आली. स्पर्धेचे उद्घाटन एसव्हीकेएम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.समीर गोयल यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. पहिल्या दिवशी पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा झाल्या. जिम्नॅस्टिक्समधील विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी पीटी ड्रिल, अॅरोबिक्स व झुम्बा, बॉल ड्रिल, क्लॅप ड्रिल सादर करण्यात आले. रिंग रेस, थ्री इन वन रेस, बॉल शटल रेस, ऑबस्टेकल रेस स्पर्धा झाली.
दुसऱ्या दिवशी तिसरी ते दहावीच्या वर्गांसाठी क्रीडा स्पर्धा झाल्या. डॉ. अमित बाफना, डॉ. बरखा बाफना व एसव्हीकेएम धुळे व शिरपूर कॅम्पसचे प्राचार्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. क्रीडा मशाल प्रज्वलित करण्यात आली. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी योगा, मास पीटी, फ्लॅग ड्रिल, झुम्बाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांसाठी वर्गवारीनुसार ऑबस्टेकल रेस, हर्डल रेस, बॅलन्स रेस, शटल रेस, ५० मीटर धावणे, रिले रेस झाली. बेस्ट हाऊस म्हणून टोपाझ हाऊसला प्रथम तर रुबी हाऊसला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. गविष प्रजापत व जीवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन मुख्याध्यापिका सुनंदा मेनन, दीपक मनोरे, पुष्परथ चकमा, मनीष सिंह, देविदास मोरे आणि अभिजित भामरे आदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.