आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात शिक्षकांची १७ हजार ५४३ पदे रिक्त:शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरा; फक्त शिकवण्याचेच काम द्यावे

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे तत्काळ भरावी, त्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे करण्यात आली. याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांची १७ हजार ५४३ पदे रिक्त आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मंजूर असलेली सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे. आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन बदल्यांचे मॅपिंग झाल्याने बदलीचे आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या पदोन्नती करण्यात येऊ नये असे निर्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेस विलंब होणार असेल तर आठ दिवसांत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनास द्यावे अशी मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कोषाध्यक्ष न्हानू माळी, जिल्हाप्रमुख संघटक कमलेश चव्हाण, रवींद्र सैंदाणे, तालुका कोषाध्यक्ष अजय बच्छाव, महानगर सचिव ललित वाघ यांनी केली आहे.

बीएलओचे कामासह अन्य अशैक्षणिक कामे देणे बंद करावे
शिक्षकांना अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर दिली जातात. त्यामुळे त्यांचे शिकवण्याचे मुख्य काम मागे पडत आहे. तसेच राज्यातील प्राथमिक शाळेत शिपाई व लिपिक नसल्यामुळे शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहे. अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून शिक्षकांना बीएलओसह सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...