आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:गवी येथे ग्रामपंचायतीच्या‎ दप्तरास आग, गुन्हा दाखल‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील ग्राम‎ पंचायतचे कुलूप तोडून शासकीय कागदपत्रे‎ पेटवून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी‎ विजय तुंगार नामक व्यक्तीवर संशय व्यक्त‎ करण्यात आला आहे. आगीत विविध‎ फाइल्स व कागदपत्रे जळून खाक झाली.‎

यात ग्राम पंचायत नमुना क्र १ ते ३३ च्या‎ विविध विषयांच्या फाइल, आवक-जावक‎ रजिस्टर, चेक बुक, ग्रामसभा प्रोसिडिंग व‎ मासिक सभा रजिस्टर, मालमत्ता फेरफार‎ अर्ज व रजिस्टर, जुन्या घरकुल वाटप यादी,‎ दारिद्र्य रेषेखालील यादी, स्वच्छतागृह‎ निधीची यादी, पाणी पुरवठा योजना २०२१ चे‎ रजिस्टर, जवाहर योजनेचे रजिस्टर, जुनी‎ सांगवी, होऱ्यापाणी व धारबर्डी गावाचे दप्तर,‎ माहिती अधिकारी फाइल, चार्ज यादी व सर्व‎ नस्ती फाइल खाक झाली. गावातील विजय‎ रघुनाथ तुंगार याने हा प्रकार केल्याचा संशय‎ आहे. ग्राम विस्तार अधिकारी सोमा उखा‎ वाघ (वय ५६ ) यांनी फिर्याद दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...