आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक सेनेत कार्यरत:फागणे शिवारात हवेमध्ये गोळीबार, जवान कोठडीत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळ असलेल्या फागणे शिवारात मध्यरात्री हवेत गोळीबार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. विकास लवटे असे त्याचे नाव असून तो प्रादेशिक सेनेत कार्यरत आहे. तसेच अन्य एका घटनेत आर्वी शिवारातून मोहंमद इस्माईल शाकी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे पिस्तुल आढळले. दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

फागणे येथील वीर एकलव्य यांच्या पुतळ्याजवळ मध्यरात्री हवेत गोळीबार झाला. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पथक गावात आले. चौकशीतून विकास महादू लवटे (रा. अंबोडे, ता. धुळे) याने गोळीबार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पिस्तुल व काडतूस जप्त केले. दुसऱ्या एका घटनेत मध्यरात्री दीड वाजता आर्वी शिवारातील एका हॉटेल जवळून महंमद इस्माईल शाकी (वय. ४५, रा. इंदुर) याच्याकडून गावठी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले. दोघांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन, सागर काळे, विजया पवार, प्रवीण पाटील, रवींद्र राजपूत, मुकेश पवार, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, नंदू चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अडीच तासात छडा
गुरूवारी मध्यरात्री ११ वाजता विकासने हवेत गाेळी झाडली. त्यानंतर तो पसार झाला. पोलिस यंत्रणा त्याच्या शोधता होती. दुसरीकडे आर्वी येथे मध्यरात्री दीड वाजता महंमद इस्माईलला पोलिसांनी ताब्यात घेतले. तोपर्यंत विकासही सापडला होता.

परवाना जम्मू काश्मिरचा
विकास प्रादेशिक सेनेत असल्यामुळे वर्षांतील काही महिने तो सेवा देतो. जम्मू काश्मिरमधील राजुरी जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने शस्त्र परवाना मिळवला आहे. महंमद इस्माईल पिस्तुल विक्रीसाठी आला होता.

बातम्या आणखी आहेत...