आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक:दोन इटीएस मशीनसह पाच संगणक; पाच प्रिंटर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा वार्षिक योजनेतून भूमी अभिलेख कार्यालयाला पाच रोव्हर मशीन, दोन इटीएस मशीन, पाच संगणक आणि पाच प्रिंटर मिळाले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते हे साहित्य भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. जमीन मोजणीची काम वेगात व्हावी यासाठी भूमिअभिलेख विभागाने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरले आहे.

त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ६२ लाख २३ हजार ६४५ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीतून जमिनी मोजणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. तसेच रोव्हरसह इतर यंत्रसामग्री हाताळणीसाठी भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना रोव्हर मशीनसह इटीएस मशीन, संगणक आणि प्रिंटर दिले. या वेळी विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलकर, उपअधीक्षक किरणकुमार पाटील, गोविंद भाबड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...