आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:जुनवणे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थिनी, सैनिक, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जुनवणे जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढून हर घर झेंडाबाबत जनजागृती करण्यात आली. १३ रोजी शाळेतील चौथीची विद्यार्थिनी नंदिनी पाटील हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १४ रोजी गावीतील सैनिक नितीन परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याच दिवशी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तर १५ रोजी ज्येष्ठ नागरिक दामू उमचंद पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या वेळी निवृत्त सैनिक प्रकाश वाकळे, सैनिक नितीन परदेशी व योगेश खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...