आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हलक्या प्रतीच्या जमिनीत फुलशेतीला बहर; ज्ञानेश्वर शिंदे करतात वर्षाला सात लाखांची उलाढाल

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून काही अंतरावर रानमळा येथे हलक्या प्रतीच्या शेतजमिनीत ज्ञानेश्वर शिंदे या युवा शेतकऱ्याने मिश्र फुलशेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. खर्च वजा जाता ज्ञानेश्वर शिंदे यांना वार्षिक साडेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

मोहाडी येथील ज्ञानेश्वर सुकदेव शिंदे यांची वडिलोपार्जित पावणेपाच एकर शेती रानमळा गावाच्या मुख्य रस्त्यालगत आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांनी १९९७ पासून शेतीत लक्ष घातले. शिंदे यांनी पारंपरिक पिके घेतली. मात्र, ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी सन २००८मध्ये फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाकाळात त्यांना फुलशेतीमुळे शाश्वत उत्पन्न मिळाले. शिंदे यांनी गुलाब, निशिगंधा, मोगरा, शेवंती आदी फुलझाडे लावली आहे. अनेक जण फुलशेती करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतात. शिंदे यांनी दोन वर्षे रेशीम शेतीही केली आहे. त्यांनी सुरुवातीला झेंडूची शेती केली आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फुलशेतीमुळे काहींना रोजगारही प्राप्त झाला आहे.

बारमाही उत्पन्नप्राप्ती
झेंडूतून चांगले उत्पन्न मिळत असले तरी या फुलांना ठरावीक सणांना अधिक मागणी असते. त्यामुळे इतरही फुलांची माहिती घेऊन त्यांचे उत्पादन ज्ञानेश्वर शिंदे यांनी घेतले. कोणत्या हंगामात कोणते फुले येतात याची माहिती घेऊन त्यानुसार गुलाब, निशिगंध, लिली या बाराही महिने येणाऱ्या फुलांची लागवड केली.

स्थानिक बाजारपेठेत पुरवठा : शिंदे यांच्या फुलांना स्थानिक बाजारात मागणी आहे. स्थानिक पातळीवर फुलांची विक्री होत असल्याने वाहतूक व इतर खर्चात बचत होते. त्यामुळे नफा वाढतो. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे फुलशेतीचा निर्णय घेत पुणे येथील प्रदर्शनाला भेट दिली. अनेक नर्सरींना भेट देवून विविध फुलांची माहिती जाणून घेतली. गेल्या बारा ते चौदा वर्षापासून फुल शेती करतो आहे. त्यातून तीन जणांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे. -ज्ञानेश्वर शिंदे, रानमळा.

बातम्या आणखी आहेत...