आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:निजामपूर गावात रॅलीवर केली पुष्पवृष्टी; भारत मातेचे प्रतिमापूजन, रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत, विद्यार्थ्यांचा सहभाग

निजामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे गावातून निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जे. के. शाह आदर्श महाविद्यालयातर्फे गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण देशभक्तीमय झाले हाेते.

निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शाह यांनी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी संचालक बारीक पगारे, राजेंद्र जगन्नाथ राणे, राजेंद्र मुरलीधर येवले, सचिव नितीन शाह, खजिनदार प्रदिप वाणी, जे. के. शाह, आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष शरदचंद्र शाह आदींनी रॅलीत सहभाग नांेदवला. जैताणे ग्रामपालिकेजवळ गटनेते बाजीराव पगारे, पंचायत समितीचे सदस्य सोनाली पगारे, पंचायत समितीचे सदस्य सतीश वाणी, जैताणेच्या सरपंच कविता मुजगे, निजामपूरच्या सरपंच सोनाली भूषण वाणी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे आदींच्या हस्ते रॅलीतील सहभागी भारत मातेच्या वेशभूषेतील विद्यार्थीनीस तिरंगा ध्वज देण्यात आला. रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी अण्णा सोनवणे, गोकुळ पगारे, राकेश शेवाळे, नंदू जाधव, ग्रामसेवक अनिल राठोड, निजामपूर पंचायत समिती सदस्य सतीश वाणी, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, निजामपूरचे उपसरपंच शाम पवार, गजानन शाह, दशरथ शेलार, तेजस जयस्वाल, युसूफ सैय्यद, रघुवीर खारकर, सखाराम विसपुते, विजय राणे, मिलिंद भार्गव आदी उपस्थित हाेते. ही रॅली अहिल्याबाई मंदिर, मेंढपाळ चौक ,मल्हार चौक, संत सावता चौक आदी भागातून निघाली.

बातम्या आणखी आहेत...