आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:पहिल्या दिवसापासून गणितावर लक्ष; स्नेहाला बारावीत 96.17 टक्के

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परीक्षेत शहरातील झेड.बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहा मेखेने ९६.१७ टक्के गुण मिळवले. शिरपूर शहरातील एच. आर. पटेल कन्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची अनम रफिक शेख ९५.१७ टक्के, अमिश्री तुरखिया आणि प्राजक्ता पाटील यांनी प्रत्येकी ९४.५० टक्के गुण मिळवले. स्नेहाने सांगितले की, कोरोनामुळे परीक्षा होतील का नाही याची चिंता होती. पण त्याचा विचार केला नाही.

अकांऊट, गणितावर पहिल्या दिवसापासून लक्ष केंद्रित केले. त्यामुळे इतर विषय आपोआप सोपे वाटत गेले. सीए फाउंडेशनची तयारी करताना बारावीच्या तयारीकडे लक्ष दिल्याने फायदा झाला. भविष्यात सीए होण्याचे स्नेहाचे स्वप्न आहे. सलग ८ ते १० तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्य असल्याने बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण मिळाले. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेण्यावर भर दिला. त्यामुळे परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना तणाव जाणवला नसल्याने स्नेहाने सांगितले. स्नेहाचे वडील एलआयसी एजंट तर आई गृहिणी आहे.

बातम्या आणखी आहेत...