आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांच्या नुसत्या जयंती साजरी करुन काही साध्य होणार नाही.त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आपल्यात जिवंत ठेवायचे असतील तर त्यांच्या विचारास अनुरुप आचरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते सुरेश शिंदे यांनी केले. परतूर तालुक्यातील आष्टी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात तर उद्घाटक म्हणून रमेश आढाव होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले, सावरगावचे सरपंच नवनाथ आयंदे, संकणपुरीचे सरपंच शिवाजी कोरडे, नंदकुमार गांजे, वसिम जमिनदार, योगेश भले, अंकुश गायकवाड यांची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचा राज्य विस्तार हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारास अनुरुप होते. अहिल्यादेवी यांचा इतिहास त्या केवळ धार्मिक होत्या ते धर्मांध नव्हत्या. त्यांनी देशभर अनेक मंदिरांचा आणि विविध नदी घाटांचा जिर्णोद्धार केला. सोबतच हिंदू- मुस्लिम या दोन समाजात ऐक्य टिकून राहावे कोणतेही वाद होऊ नये म्हणून मस्जिद बांधल्या. त्याकरिता जमिनी इनाम म्हणून दिल्या. आज देशात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत त्या सोडवल्या जात नाही. शासनकर्ते आपले अपयश लपविण्यासाठी आज देशात विविध मुद्दे उभे करीत आहेत. तरुणांनी या वादात न पडता आपले शिक्षण, व्यवसायाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबूराव गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर शिंदे यांनी तर ज्ञानेश्वर सागुते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे मल्हारराव होळकर कमिटीने परिश्रम घेतले. यावेळी आष्टी व परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.