आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गजानन महाराज मंदिरात दर रविवारी होणार अन्नदान

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री. गजानन महाराज मंदिरात दर रविवारी अन्नदान होत हाेते. कोरोनामुळे हा उपक्रम बंद करण्यात आला होता. तो आता पूर्ववत सुरू झाला आहे. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले व सुनंदा केले यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप सुरू झाले.

मेघराज पंडित पाटील बाळापूर फागणे, पद्माकर मुरलीधर जोशी यांनी अन्नदान केले. या वेळी कमलाकर जोशी, तुळशीराम बोरसे, दिलीप भट, नरेंद्र जोशी उपस्थित होते. यापुढे दर रविवारी अन्नदान केले जाणार आहे. आप्तस्वकीयांचा वाढदिवस, स्मृतिदिनानिमित्त अन्नदान करता येणार आहे. उपवास नसल्यास भाकरी, पिठले, ठेचा, मसाले भात व उपवास असल्यास साबुदाणा वाटप होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...