आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:आफ्रिकेतील खेळाडूने दिले फुटबॉलचे प्रशिक्षण ; मार्गदर्शन : साक्रीत सुरू असलेल्या क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभाग, पुन्हा सहकाऱ्यांसह येण्याचे आश्वासन

साक्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, साक्री तालुका क्रीडा संकुल समिती, साक्री तालुका क्रीडा संयोजक व क्रीडांगण प्रतिष्ठानतर्फे प्राथमिक क्रीडा कौशल्य विकास उन्हाळी शिबिर झाले. या शिबिरात पश्चिम आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉल खेळाडू थॉमसने खेळाडूंना फुटबॉलचे धडे दिले. या वेळी क्रीडांगण प्रतिष्ठानचे डॉ. अनिल नांद्रे, तालुका फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राहुल भोसले, विकी कोळपकर, क्रीडा मार्गदर्शक धनंजय सोनवणे, अनिल पाटील, यशपाल देसले, मंगळू माळचे, सुदर्शन जाधव, मनिष जाधव, चेतन महाजन, जयेश चव्हाण, सोमेश पवार आदी उपस्थित होते. या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना थॉमस म्हणाला की, फुटबॉल हा खेळ खेळताना प्रत्येक खेळाडूने मनाची एकाग्रता केली पाहीजे. खेळात आपल्या सहकारी खेळाडूंच्या हालचाली व त्यांनी दिलेली गोल करण्याची संधी ओळखता आली पाहिजे. खेळ खेळताना योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता असणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर तज्ञ व ज्येष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शन घेऊन आपल्यातील उणीव सरावातून भरून काढणे हे महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी खेळावर खूप प्रेम केले पाहीजे. तसेच सराव करून उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवावा. साक्री शहरात माझ्या सहकाऱ्यांसह येऊन प्रशिक्षण देईल असे आश्वासन थॉमसने दिले. क्रीडा मार्गदर्शक धनंजय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिल नांद्रे व राहुल भोसले यांनी खेळाडूंशी संवाद साधला. क्रीडा मार्गदर्शक अनिल पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...