आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नव्याने निर्माण हाेणारे कृषी विद्यापीठ धुळे शहरात करावे, अशी मागणी विद्यापीठ निर्माण कृती समिती आणि शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी साेमवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना स्मरणपत्र देण्यात आले. नंदुरबार, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विद्यापीठ शहरात व्हावे, अशी मागणी करण्यात आली. गेल्या तेरा वर्षांपासून विद्यापीठासाठी आंदोलन केले जात असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक प्रा. शरद पाटील यांनी दिली.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. या वेळी युवासेनेचे यशवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल साेनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जाेंधळे, साहेबराव देसाई, महानगरप्रमुख डाॅ. सुशील महाजन, धीरज पाटील, भरत माेरे, तुषार जाधव, कैलास मराठे, ललित माळी, प्रवीण साळवे, शुभम मतकर, महादू गवळी, संजय बनसाेडे आदी उपस्थित होते. आहे. नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने समिती नेमली होती. या समितीने धुळे शहरात विद्यापीठ करावे, असा अहवाल शासनाला दिला आहे. त्याचबरोबर खान्देशातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची गरज आहे. विद्यापीठासाठी आवश्यक सुविधा कृषी महाविद्यालयात असल्याने विद्यापीठ धुळ्यात करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
अनेक वर्षांत एकही मोठी संस्था आली नाही
नाशिक, जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत गेल्या ६५ वर्षांत एकही माेठा प्रकल्प जिल्ह्यात आला नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी लढा उभारूनही ते जळगावला स्थापन करण्यात आले. मुक्त विद्यापीठासह आराेग्य विद्यापीठ नाशिकला देण्यात आले. त्यामुळे आता कृषी विद्यापीठाचे विभाजन झाल्यावर नवीन कृषी विद्यापीठ शहरात स्थापन करावे. कारण शहरातील कृषी महाविद्यालयात नवीन कृषी विद्यापीठासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती या वेळी जिल्हाधिकारी शर्मा यांना देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.