आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअगदी इंग्रजांच्या कालावधीपासून म्हणजे सन १९०७ पासून स्थापन असलेल्या पोलिस दलात ११६ वर्षात प्रथमच चाँद तडवीच्या रुपाने तृतीय पंथियाने पोलिस भरतीसाठी आव्हान दिले. जळगाव जिल्हयातील रहिवाशी असलेल्या चाँद तडवी उर्फ बेबो पार्वती जोगी ने धुळ्यातून अर्ज दाखल केला आहे. गुरुवारी होणाऱ्या चाचणीत चाँद सुमारे वर्षभराचा सराव व प्रचंड आत्मविश्वासाने उतरणार आहे. पोलिस झाली तर समाजसेवेलाच प्राधान्य राहील. शिवाय तृतीयपंथीयांचा सन्मान अधिक वाढवण्याचा मानस असल्याचे चांद सांगते.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सध्या ४२ पदांसाठी भरती होते आहे. त्यासाठी ३ हजार ९०० पेक्षा अधिक अर्ज आले आहे. परंतु इंग्रज कालापासून ११६ वर्ष व महाराष्ट्र पोलिस स्थापनेच्या ६२ वर्षांच्या काळात मात्र प्रथमच ही भरती वेगळे महत्व राखून आहे. भुसावळ येथील तृतीयपंथी चाँद सरवर तडवी (वय २७) च्या रुपाने यंदाची भरती वेगळी ठरणार आहे. पोलिस भरतीसाठी सुमारे वर्षभरापासून चाँद तयारी करत होती. मैदानी सराव सोबत अभ्यासावर ही लक्ष केंद्रीत केले आहे. धावणे व गोळाफेक मध्ये चाँद अधिक उजवी ठरणार आहे.
तसा कसून सराव केल्याचे सांगते. सन २०२१ मध्ये पोलिस भरतीसाठी महिला प्रवर्गातून चाँदने चाँद उर्फ बेबो पार्वती जाेगी अर्ज भरला. परंतु नुकताच सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी सन्मानाने शासकीय सेवेत स्थान दिल्यावर चाँद ते आता थर्ड जेंडर म्हणून उमेदवारी नमूद केली आहे. परंतु चाँद हिचा हा प्रवास सहज व सोपा नव्हता.
खडतर परिश्रम सोसतांना तिच्या कुटूंबियांनीही तिला आधार दिल्याचे ती आवर्जून सांगते. पोलिस भरतीसाठी चाँद शहरात दाखल झाली आहे. पार्वती परशुराम जाेगी तिचे गुरू तर आमच्यासाठी लढा देणारे आर्या पुजारी प्रेरणास्थानी आहे. शिवाय स्वरा जोगी, संदल जोगी, निलू जोगी, समीभा पाटील, दिशा पिंकी शेख, मयुरी आवडेकर, विक्की शिंदे, प्रशिक्षण इरफान शेख व समाधान तायडे यांनी नेहमीच मनोबल वाढवल्याचे चाँद उर्फ बेबो पार्वती जाेगी अभिमानाने सांगत आहे.
मनोबल आहे उंच
तृतीय पंथीय म्हणून माझाच केवळ एकमेव अर्ज आहे. शिवाय वर्षभरापासून सराव व अभ्यास केला आहे. त्यामुळे मी पात्र ठरेल. असा विश्वास आहे. शिक्षण हे गरजेचे असल्यामुळे केवळ आम्हीच नाही तर उपेक्षित घटनकांनीही घेतले पाहिजे.- चाँद तडवी, पोलिस भरती उमेदवार
बी. कॉमची विद्यार्थिनी
चाँद ही टि.वाय.बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील राजकुवर कॉलेजची ती विद्यार्थीनी आहे. शासकीय नोकरीच्या ध्यास घेत तिने आतापर्यंत रेल्वे, आरोग्य व पोस्ट विभागाची देखील परीक्षा दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.