आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार्य:महाराष्ट्रात प्रथमच 13 ठिकाणी  महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रशिक्षण, पोलिसांच्या मदतीला, विमानतळ, रुग्णालय देणार सेवा

गणेश सूर्यवंशी | धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील २६/११ च्या घटनेनंतर राम प्रधान समितीच्या अहवालावरून अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन हजार ६९० जवानांचे प्रशिक्षण शुक्रवारी पूर्ण झाले. महाराष्ट्रातील विविध १३ ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे जवान आता पोलिसां प्रमाणेच शासकीय रुग्णालय, विमानतळ, मेट्रो व इतरत्र ठिकाणी बंदोबस्तावर राहणार आहे. त्यामुळे पोलिस दलाला देखील मदत होणार आहे.

गुन्ह्यांचा तपास, सततचा बंदोबस्त अन् मंत्र्याचा दौरा यामुळे पोलिस दल नेहमीच व्यस्त असते. पोलिसांना आवश्यक त्या ठिकाणी मदत व्हावी या उद्देशाने १९ एप्रिल २०१० मध्ये २५० जवानांच्या रुपाने महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळाच्या माध्यमातून शासन नियमांप्रमाणे या जवानांची सप्टेंबर २०२२ मध्ये भरती झाली. त्यातून निवड झालेल्या दोन हजार ७२६ जवांनांची राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध १३ ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर या जवानांचे शुक्रवारी विविध १३ प्रशिक्षण केंंद्रात दोन हजार ६९० जवानांचे पथ संचलन झाले. शासकीय रुग्णालय, विमानतळ, मेट्रो, सौर ऊर्जा, ओनजीसी, ऊर्जा प्रकल्प, न्यायालय तसेच विविध शासकीय कार्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी या जवानांवर राहणार आहे. या जवानांना मागणी नुसार विविध ठिकाणी येत्या १० दिवसात नियुक्त केले जाणार आहे. तर नाशिक विभागातील पहिले प्रशिक्षण हे धुळे येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर झाले. यावेळी १९७ जवानांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. त्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.

बेळगाव नंतर एसआरपी : महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये भरती झालेल्या जवानांचे पहिले प्रशिक्षण हे बेळगाव येथे झाले होते. शिवाय यानंतर ही राज्या बाहेर प्रशिक्षण देण्यात आले. तर यावेळी भरती झाल्यानंतर महामंडळाने राज्य राखीव पोलिस दलाची प्रथमच मदत घेतली. त्यामुळे २०२२ मध्ये महाराष्ट्रात प्रथमच या जवानांची तुकडी प्रशिक्षित झाली. ८ जणांचा राजीनामा : प्रशिक्षण काळात ८ जवांनानी राजीनामा दिला. यात सर्वाधिक ४ हे धुळे केंद्रातील तर दौंड गट क्र ७ व मुंबई गट क्रं. ११ मधील प्रत्येकी दोन जवांनाचा समावेश आहे.

शासन सोबत समाजाला मदत ^महाराष्ट्र सुरक्षा बला चे जवान यांचे संपुर्ण राज्यातील कामगिरी चांगली राहिली आहे. शिवाय पोलिस दलाला देखील त्याची मदत होते आहे. राज्या प्रमाणेच धुळयातही प्रथमच जवांनाचे खरतर प्रशिक्षण झाले. या जवानांची शासन व पर्यायाने समाजाला मदत होवु शकेल. -दिनकर पाटील, प्रशिक्षण समन्वय अधिकारी, धुळे

१३ प्रशिक्षण केंद्रे : सर्वाधिक प्रशिक्षणार्थी पीटीएस नानवीजमध्ये ठिकाणजवान संख्या पुणे गट क्र.१ १५० पुणे गट क्र.२१९२ नागपूर गट ४१०० दाैंड गट क्र. ५ १९२ धुळे गट क्र. ६ १९७ दौंड गट क्र. ७ १९४ मुंबई गट क्र. ८ १९८ अमरावती गट क्र. ९ १६९ सोलापूर गट क्र. १० २९८ मुंबई गट क्र. ११ २५० हिंगोली गट क्र. १२ २०० औरंगाबाद गट क्र. १४ २५० पीटिएस नानवीज ३००

बातम्या आणखी आहेत...