आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने यंदा होेळी व धूलिवंदनावर कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे उत्साह वाढला आहे. बाजारात होळी, धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहे. शहरात पत्र्यापासून तयार केलेल्या डाेलचीतून धूलिवंदनाच्या दिवशी एकमेकांना पाण्याचे फटके मारण्याची परंपरा आहे. पण यंदा बाजारात पत्र्याच्या डाेलची एेवजी प्लास्टिकची डाेलची विक्रीसाठी आली आहे. तिचा प्रथमच वापर हाेणार आहे. शहरात आठ दिवसांपासून होळी व धूलिवंदनाची तयारी सुरू आहे.
त्यासाठी शहरातील प्रमुख चौकात पाण्याच्या टाक्या ठेवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच काही ठिकाणी कृत्रिम कारंज्याची साेय करण्यात येणार आहे. कोरोना नसल्याने यंदा तीन वर्षांनतर धूलिवंदन निर्बंधमुक्त वातावरणात हाेणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह आहेे. अनेकांचा कल पर्यावरण पूरक धूलिवंदनाकडे आहे. त्यादृष्टीने बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी आले आहे. शहरातील फुलवाला चाैक, आग्राराेड, पाचकंदील, जयहिंद चाैक, संताेषी माता चाैक, दत्त मंदिर चाैक आदी भागात पिचकारी आणि रंग, मुखवटे विक्रेत्यांनी दुकान थाटली आहे. बाजारात ५० रुपयांपासून तीन हजारापर्यंतच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी आल्या आहे.
डोलची ३० ते ५० रुपयांना : शहरात पत्र्यापासून तयार केलेल्या डाेलचीतून धूलिवंदनाच्या दिवशी एकमेकांना पाण्याचे फटके मारण्याची परंपरा आहे. पण यंदा बाजारात पत्र्याच्या डाेलची एेवजी प्लास्टिकची डाेलची विक्रीसाठी आली आहे.तिचा प्रथमच वापर हाेणार आहे. बाजारात३० ते ५० रुपयांना प्लास्टिकची डोलची विक्रीसाठी आहे. विविध आकर्षक रंगात ही डोलची उपलब्ध असल्याने तिला चांगली मागणी असल्याचे फुलवाला चाैकातील विक्रेते अनिल वाणी यांनी सांगितले.
होळीसाठी गोवऱ्यांचा वापर
हाेळी पर्यावरणपूरक व्हावी या उद्देशाने श्री लालबाग भाेले गाै सेवा धामतर्फे गोवऱ्यांची अल्पदरात विक्री केली जात आहे.दहा गोवऱ्या वीस रुपयांना विक्री केल्या जात असून गोवऱ्यांना चांगली मागणी असल्याची माहिती गाे-सेवक गाेपाल बालमुकुंद शर्मा यांनी दिली. काही संस्थांनी कचऱ्यापासून पर्यावरण पूरक होेळी करण्याचे यंदाही नियोजन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.