आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:विदेशी मद्य; देशी-विदेशी मद्य लांबवल्याप्रकरणी तिघे संशयित ताब्यात

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे बिअरबारच्या खिडकीतून आत शिरून चोरट्यांनी विदेशी मद्य लांबवले. दुसऱ्या घटनेत देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर तिघांना ताब्यात घेतले. शिवाय अन्य एका घरफोडीची या तिघांकडून उकल झाली. पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर विजयानंद परमीट रूम बिअरबारच्या खिडकीतून मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश केला.

त्यानंतर विदेशी मद्य लांबवले. दुसऱ्या घटनेत अन्य देशी दारूच्या दुकानाच्या मागील बाजूचे गेट तोडून चोरटे आत आले. त्यानंतर मद्य व रोकड लांबवण्यात आले. त्याची एकत्रित किंमत पोलिसांनी २४ हजार २९० रुपये आकारली आहे. घटनेबद्दल आकाश संजय चौधरी (वय २९, रा. भोई गल्ली, पिंपळनेर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विचारणा केल्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या सेवा मोबाइल दुकानातील चोरीची उकल झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...