आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरोग्य:डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्याचा आरोग्यला विसर

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीनिमित्त आरोग्य विभागातर्फे डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार दिला जातो. पण सन २०१९ पासून हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. पुरस्कारासाठी निवड समितीही गठीत होत नाही. डाॅ. आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ २६ फेब्रुवारीला महिला आरोग्य दिन साजरा होतो.

या दिवसाचे औचित्य साधून शासनातर्फे शासकीय, अशासकीय, खासगी आरोग्य संस्थेसह महिला व पुरुष डॉक्टरांना डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार यांना देण्यात येतो. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असून सर्व व्यवहार पूर्वपदावर आलेे आहे. त्यामुळे यावर्षी पुरस्काराचे वाटप करावे, त्यासाठी प्रस्ताव मागवावे, अशी मागणी गायत्री सोशल अॅण्ड वेल्फेअर संस्थेचे अॅड. चंद्रकांत येशीराव, अॅड. धनश्री येशीराव, रोशनी सैंदाणे, तेजस्विनी धाकड, ईश्वर बारी, जयश्री लहामगे, गायत्री शिरसाठ, वैभव ठाकरे, विजया भामरे यांनी केली आहे. याविषयी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार-जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन आता पुरस्कार देण्याविषयी काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

२०१९ पासून समिती नावालाच
माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बालआरोग्य विषयक सेवा प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणे आदी उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर निवड असते. सन २०१९ पासून या समित्या कागदावर आहे. चार ते पाच वर्षांपासून पुरस्काराचे वितरण झालेले नाही. पुरस्कार मिळाल्याने कामासाठी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे पुरस्कार वितरण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी होते आहे.

बातम्या आणखी आहेत...