आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्मा स्मारक:तळोद्यात स्वातंत्र्यदिनी हुतात्मा स्मारकाचा प्रशासनाला विसर

तळोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी तळोद्यातील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र्य सैनिकांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे. शहरात शासनाकडून तळोदा तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी कारावास भोगला व आपले जीवन स्वातंत्र्यासाठी अर्पण केले अशा ११ स्वतंत्रता सेनानी यांच्या स्मरणार्थ व शहिदांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक मुख्य बाजारपेठेत व प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात उभारण्यात आले आहे.

या स्मरकावरील शिलालेखावर ११ स्वातंत्र्य सैनिकांचे समरणार्थ त्यांची नावे कोरण्यात आली आहेत; परंतु सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असताना या ठिकाणी प्रशासनाकडून नगरपालिकेकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून कोणी साधे अभिवादन सुद्धा केले नाही. एवढेच काय तर कोणी साधे एक फुल सुद्धा अर्पण केले नाही. त्याच स्मारकावरून सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातील मोठे अधिकारी, तहसील कार्यालयात प्रशासकीय इमारतीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास गेले. परंतु कोणालाच या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी १ मिनिट उभे राहून शहीद आणि तळोदा येथील स्वातंत्र्यसैनिकांचा स्मृतीला वंदन करून अभिवादन करण्याचे सुचले नाही.

पालिकेने रंगरंगोटी केली पण अभिवादनाचा पडला विसर
तळोदा पालिकेने ४ दिवसांपूर्वीच हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी केली; परंतु पालिका प्रशासन व पालिकेच्या लोकप्रतिनिधी किंवा याच स्मारकावरून प्रशासकीय इमारतीत जाणाऱ्या सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी हुतात्म्यांना व स्वतंत्रता सेनानी यांना साधे अभिवादन करून पुष्पसुद्धा अर्पण केले नाही. सगळ्यांनाच स्वतंत्रता सेनानींचा आजच्या दिवशी विसर पडला याचे दुःख वाटते.उल्हास मगरे, स्वातंत्र्यसैनिक, भगवान गोविंद शेंडे यांचे वंशज (नातू)

बातम्या आणखी आहेत...