आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:माजी नगरसेवक पुत्राने थाटला बनावट मद्याचा कारखाना‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साक्री रोडवरील राजीव गांधी‎ नगर परिसरात बनावट मद्याचा मिनी‎ कारखाना पोलिसांनी बुधवारी दुपारी‎ उद्ध्वस्त केला. हा कारखाना माजी‎ नगरसेवकाचा पुत्र धनराज शिरसाठचा‎ असल्याचे समोर आले. या प्रकरणी‎ त्याच्यासह या चार जणांंवर शहर‎ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.‎ राजीव गांधी नगरातील नाल्याजवळ‎ पत्र्याचे शेड होते. तेथे बनावट विदेशी‎‎‎‎‎‎‎‎ मद्याची निर्मिती होत असल्याने‎ पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी‎ तिघांनी नाल्यातून पळ काढला.‎ घटनास्थळी बनावट मद्याने भरलेल्या‎ बाटल्या, खोके, स्पिरीट, रसायन,‎‎‎‎‎‎‎‎ रिकाम्या बाटल्या, बूच, दोन दुचाकी‎ आढळल्या.

हा कारखाना धनराज‎ शिरसाठने थाटला होता. त्याला ऋतिक‎ मोरे, आकाश अहिरे, सोनू पवार मदत‎ करत होते. कारवाईवेळी ऋतिक, सोनू‎ व आकाशने पळ काढला. जप्त मुद्देमाल‎ २ लाख ९३ हजार ९७० रुपयांचा आहे.‎ पोलिस अधिकारी आनंद कोकरे,‎ सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब‎ पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय उजे,‎ कर्मचारी मच्छिंद्र पाटील, कुंदन पटाईत,‎ प्रल्हाद वाघ, नीलेश पोतदार, प्रवीण‎ पाटील, महेश मोरे, तुषार मोरे, मनीष‎ सोनगिरे, गुणवंतराव पाटील, अविनाश‎ कराड, शाकीर शेख, किरण भदाणे,‎ शाहीद शेख यांच्या पथकाने कारवाई‎ केल्याचे सांगण्यात आले.‎

यापूर्वीही गुन्हे दाखल, साक्रीराेड परिसरातच कारवाई‎
संशयित धनराज शिरसाठ माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांचा मुलगा आहे.‎ त्याच्यावर यापूर्वीही बनावट मद्य प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी‎ दिली. विशेष म्हणजे साक्री रोड परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतरही‎ गैरप्रकार थांबला नाही.‎

बातम्या आणखी आहेत...