आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिकीकरणाच्या युगात ग्राहकांची दैनंदिन व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी व त्यांच्या हक्काविषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत ग्राहक पंचायतीच्या नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी केले.
शहरातील झेड.बी. पाटील महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व सामाजिक शास्त्र मंडळातर्फे डॉ.योगेश सूर्यवंशी यांचे ‘ग्राहकांची जनजागृती’ या विषयी १५ मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ.पी.एच.पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माजी उपप्राचार्य अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस.पवार ,डॉ.डी.के. पाटील महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या संयोजिका व उपप्राचार्य डॉ. वर्षा पाटील तसेच धुळे तालुका ग्राहक पंचायत कार्यकर्ते बी.डी. पाटील उपस्थित होते. डॉ. योगेश सूर्यवंशी म्हणालेत, ग्राहकांमध्ये व्यावहारिक सजगता येण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो.
जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण बऱ्याचदा व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून भरपाई कशा प्रकारे मिळवता येते या विषयी माहिती असणे आवश्यक आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना तिचे मूल्य उत्पादनाचा दिनांक एक्सपायरी डेट बघितली पाहिजे. दुकानदारांकडून पावती घेतली पाहिजे. प्राचार्य पी.एच. पवार म्हणाले, ग्राहक हा सजग पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी करताना चौकस असावे यासाठी ग्राहकांची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सामाजिक शास्त्र मंडळाचे संयोजक डॉ.अमोल पाटील, सूत्रसंचालन प्रा. संगीता लोहालेकर यांनी केले. प्रा. गायत्री रवंदळे यांनी आभार मानले. प्रा.डॉ.शशिकांत खलाणे, प्रा.विशाल बोरसे, प्रा. राहुल पाटील, प्रा.उदय पाटील, प्रा. वैशाली जवराळ, प्रा. नितीन पाटील, प्रा. मनोज बच्छाव, प्रा.प्राची खंडेलवाल प्रा. गोविंद पवार यांनी परिश्रम घेतले.
तक्रार करण्यासंदर्भात माहिती
फसवणूक झाली तरी ग्राहकांना राज्य व जिल्हास्तरीय ग्राहक मंच व ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. फसवणूक झाल्यावर कुठे व कशी तक्रार करावी याची माहिती त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.