आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीटर बदलले:पथदिव्यांचे चाळीस फॉल्टी मीटर बदलले

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपूर भागात पथदिव्यांच्या वीज जोडणीचे ४० मीटर फाॅल्टी होते. हे आता बदलण्यात आले आहे. त्यामुळे वीजबिलावर होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. महापालिकेला दरमहा वीजबिलावर ३४ लाख रुपये खर्च करावे लागतात. हा खर्च कमी करण्यासाठी शहरातील सर्व भागात एलईडी पथदिवे बसवण्यात आले.

आत्तापर्यंत १६ हजार एलईडी पथदिवे बसवण्यात आले आले आहे. दुसरीकडे देवपूर भागातील पथदिव्यांचे वीजमीटर फॉल्टी होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीला हे मीटर दुरुस्तीसाठी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार वीज कंपनीने आत्तापर्यंत ४० मीटर बदलले असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...