आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:15 दिवसांपासून चारशे कुटुंबांना पाणीच नाही

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुस्लिमनगर भागात पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने चारशे ते पाचशे कुटुंबाची गैरसोय होते आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून पाणी सोडल्यावरही परिसरातील नळांना पाणी येत नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीने अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन दिले.

या वेळी नगरसेवक अमीन पटेल, मुख्तार मन्सुरी, डॉ. सर्फराज अन्सारी, वसीम मंत्री, वसीम बारी, सलीम टंकी, जाविद हुसेन आदी उपस्थित होते. मुस्लिमनगरात १५ दिवस झाले तरी पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात मायक्रो जलकुंभातून पाणीपुरवठा होतो. या जलकुंभातून येणारी जलवाहिनी स्लॉटर हाऊसपासून कट करण्यात आली आहे. हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...