आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विधी शाखा प्रवेशाला यंदा चार महिन्यांचा विलंब; आता दिवाळीनंतरच भरणार वर्ग

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेनंतर आता प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया होतात. यंदा सीईटी परीक्षांचे निकाल उशिरा जाहीर झाल्याने त्याचा फटका प्रवेश प्रक्रियांना बसला आहे. विधी शाखेच्या तीन व पाच वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश तब्बल तीन ते चार महिने विलंबाने होणार आहे.

इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेनंतर आता प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी शाखेसह शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. कॅप राउंडची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. नियमित वर्ग सुरू होण्यासाठी जानेवारी महिना उजाडेल. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी मिळेल. बारावीनंतर पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. पदवीधरांना तीन वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. दरम्यान, यंदा विधी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावणार आहे.

‘शिक्षणशास्त्र’ चे प्रवेश, १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
एमएड पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी बीए, बीएस्सी-बीएड विद्यार्थ्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत, बीएड विद्यार्थ्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत, बीपीएडसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत तर एमएडसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत फॉर्मची मुदत आहे.

बातम्या आणखी आहेत...