आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:लोणखेडा महाविद्यालयाच्या चौघींची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

खेडदिगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणखेडा (ता.शहादा) येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शहादाच्या चार महिला खेळाडूंची आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

यात मितल अंबालाल माळी, आरती अशोक अहिरे, आकांक्षा कैलास पाटीदार, वैष्णवी प्रकाश सूर्यवंशी या चार महिला खेळाडूंची दीनबंधू छोटूराम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ मुर्थल, सोनीपत, हरियाणा येथे दि. १० ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेकरीता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अरविंद कांबळे यांनी केले. त्यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर, क्रीडा मंडळाचे संयोजक डॉ.आय.जे.पाटील,डॉ.ए.एच.जोबनपुत्रा, डॉ.वर्षा चौधरी, डॉ.जी.एस.गवई, प्रा.महेश जगताप, प्रा. खुमानसिंग वळवी, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अरविंद कांबळे यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...