आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना काळात शासनाकडून माेफत धा्य वाटप सुरू केले हाेते. मात्र डिसेंबरपासून ते बंद करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यानंतर केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा याेजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून एक वर्षभर माेफत अन्नधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली.
त्याचा लाभ जिल्ह्यातील १४ लाख ६४ हजार ८१० शिधापत्रिका लाभार्थ्यांना माेफत धान्याचा लाभ मिळणार अाहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा याेजनेंतंर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रूपये प्रति किलाे दराने तांदुळ तर २ रूपये प्रती किलाेच्या दराने गहू व १ रूपये प्रति किलाेच्या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत हाेते. धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ३ लाख १ हजार ८०२ रेशनकार्ड धारक असून त्यामध्ये अंत्योदय योजनेतंर्गत ७५ हजार १५ व प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लाख २६ हजार ७८७ असे एकूण ३ लाख १ हजार ८०२ पात्र शिधापत्रिका धारकांमधील एकूण १४ लाख ६४ हजार ८१० पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.
कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना दरमहा रेशन दुकानातून मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत होते. कोरोना काळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले असून आता या रेशन कार्डधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून वितरण व्यवस्थेवर प्रशासनातर्फे चोख लक्ष ठेवण्यात येणार आहे.
तक्रार असल्यास संपर्क साधा
या योजनेच्या अंमलबजावणीबाबत लाभार्थ्यांची कोणतीही तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावाण. -रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.