आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंग फाऊंडेशन, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान व जळगाव येथील परिवर्तन संस्थेतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय ज्येष्ठ रंगकर्मी यादव खैरनार स्मृती परिवर्तन नाट्य महोत्सवाला प्रारंभ झाला. महोत्सवात पहिल्या दिवशी अपूर्णांक या नाटकाचा दोन अंकी प्रयोग सादर झाला. या नाटकात मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवन जगण्याच्या संघर्षावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न झाला. दोन तास या नाटकाने रसिकांना खिळवले.
शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात महोत्सवाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे, जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, सचिन संघवी, रंजना खैरनार, मधुकर शिरसाठ, प्रा. योगिता पाटील, जगदीश देवपूरकर, हर्षदा कोल्हटकर, सुनिला भोलाणे, यंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप देवरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. प्रा. योगिता पाटील यांनी माजी कुलगुरू एन. के. ठाकरे यांची कविता वाचली. तसेच अपूर्णांक या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. रंगकर्मी शंभू पाटील यांनी या नाटकाचे मराठी रूपांतरण केले आहे.
जळगावच्या परिवर्तन संस्थेने राज्यभरात या नाटकाचे प्रयोग सादर केले आहे. मंजूषा भिडे, प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर, राहुल निंबाळकर, शंभू पाटील यांनी विविध भूमिका साकारल्या. नाटकाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे असून प्रकाश योजना सुजय भालेराव, पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी, नेपथ्य सुनिला भोलाणे यांचे होते. वेशभूषा व रंगभूषा जयश्री पाटील यांनी केली. निर्मिती प्रमुख म्हणून हर्षदा कोल्हटकर होत्या. यशस्वितेसाठी यंग फाऊंडेशन, परिवर्तन नाट्य संस्था, संदीप देवरे, सुजय भालेराव, सचिन सिंघवी, मधुकर शिरसाठ, विलास चव्हाण प्रयत्नशील आहे.
आज होणार ‘पालखी’ महोत्सवात उद्या शनिवारी दि. बा. मोकाशी लिखित पालखी हे वारीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे सांगीतिक सादरीकरण सादर होणार आहे. तसेच रविवारी ‘रेगिस्थान से हिंदुस्थान तक’ हा कार्यक्रम सादर होईल. हा कार्यक्रम डॉ. दिलीप पांढरपट्टे सादर करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.