आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक दृष्टिदान दिवस व प्रवीण आय क्लिनिकच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११९ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, नगरसेवक हितेंद्र महाले, जितेंद्र गिरासे, रोटरी सीनिअरचे माजी अध्यक्ष चेतन सिसोदिया, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष महेश कुकरेजा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विक्रम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात प्रवीण महाजन व शंकरा आय हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी १७० रुग्णांची तपासणी केली. त्यातून ११९ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. त्यांच्यावर आणंद येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होतील. शिबिराच्या यशस्वितेसाठी भगवान माळी, प्रल्हाद पाटील, हेमंत माळी, महेंद्र महाजन, सागर गिरासे आदींनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.