आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:75 विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप

नंदूरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भालेर येथील क. पू. पाटील विद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक्स लन्सिया डिजिटल टेक्नॉलॉजी, पुणे व सीएसआर फंडातून खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते ७५ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून कोळदा जि.प. सदस्या डॉ. सुप्रिया गावित, जि.प. सदस्या राजश्री गावित, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील, सचिव भिका भाना पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील तसेच सर्व संचालक मंडळ शाळेच्या प्राचार्य विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए.व्ही. कुवर, संस्थेचे हितचिंतक व माता पालक व पालक कार्यक्रमास उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...