आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोपांचे वितरण:दोंडाईचात विद्यार्थ्यांना रोपांचे मोफत वितरण

दोंडाईचा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिखर बँकेचे माजी संचालक व रावल उद्योगसमूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते रोपांचे वितरण करण्यात आले.

या वेळी हस्ती स्कूल शालेय समितीचे चेअरमन कैलास जैन, स्थानिक शालेय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, प्राचार्य हरिकृष्ण निगम आदी उपस्थित होते. सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने रोपांचे वाटप करण्यात आले. त्यात निंब, साग, आंबा, जांभूळ, पेरू, लिंबू आदींचा समावेश होता. या वेळी सरकारसाहेब रावल म्हणाले की, हस्ती परिवाराने पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या वृक्षांचे घराच्या अंगणात अथवा परिसरात रोपण करून त्यांचे संवर्धन करावे. विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकांचा स्वाभिमान बाळगावा व उज्ज्वल भविष्य घडवावे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...