आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:सोनगीरच्या शिबिरात 40 बांधकाम कामगारांची झाली मोफत तपासणी

सोनगीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपले सरकार सेवा कक्षातर्फे बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला. शिबिरात ४० कामगारांची तपासणी करण्यात आली. सोनगीरसह परिवारात ७०० ते ८०० कामगार आहेत. सर्व कामगारांची टप्प्याटप्प्याने नोंदणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाला जिल्हा व्यवस्थापक अविनाश चकोर, तालुका व्यवस्थापक राहुल पाटील, केंद्र चालक शुभम तांबट, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. एन. कुवर, सरपंच रुखमाबाई गोरख ठाकरे, उपसरपंच विजूबाई रमेश बडगुजर, आरोग्य विभागातील कर्मचारी राहुल अहिरे, जिल्हा व्यवस्थापक डिंपल भंगाळे, डॉ. वीरेंद्र चौधरी, गोरखनाथ गायकवाड, मनोज कलाम, लक्ष्मी बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...