आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची मागणी:पिंगाणेजवळील शेतामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार; शेतकरी, मजुरांमध्ये भीती

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंगाणे ते धुरखेडा रस्त्यावर उसाच्या शेताला लागून शेतकऱ्यांना २ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता बिबट्या वावरताना दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून वन विभागातील कर्मचाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिंगाणे तालुका शहादा येथील प्रगतशील शेतकरी माजी पंचायत समिती माजी सभापती माधव जंगू पाटील यांच्या धुरखेडा रस्त्यावरील शेताजवळ बिबट्या बसलेला आढळून आला. माधव पाटील हे आपल्या शेताकडे कारने जात असतांना लांबून त्यांना बिबट्या नजरेस पडला. त्यांनी त्यांची छायाचित्रे देखील काढली.

सदरची वार्ता पिंगाणे व धूरखेडा परिसरात पसरल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भिती निर्माण झालेली आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी आता शेतमजूर शेतात जाण्यासाठी हिम्मत करणार नाहीत. सदर बिबट्या लागलीच बाजूच्या उसाच्या शेतात शिरला. माधव पाटील यांनी लागलीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी केली आहे. शहादा तालुक्यात सातत्याने ग्रामीण भागात शेतांमध्ये बिबट्या बाबत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकरी अथवा शेतमजूर हल्ले देखील केलेले आहेत. शेळ्या व इतर जनावरे फस्त केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. बिबटे पकडले देखील आहेत.

बातम्या आणखी आहेत...