आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा नैपुण्य:कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर; खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध खेळाचे मार्गदर्शन

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा महासंघ व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक वर्षातील विविध खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर गरुड मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. शिबिरात विविध खेळा बाबत माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शहरातील साक्री रोडवरील गरुड मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष महेश घुगरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र महाले, जितेंद्र चौवटिया, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते तथा आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू सिद्धार्थ कदम, खो-खो-कबड्डी राज्य क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, क्रिकेट खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत कढरे, महानगर खो-खो संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, जिल्हा कुस्ती संघटनेचे सचिव सुनील चौधरी, कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष हेमंत भदाणे, सचिव राहुल पाटील, रविकर बागुल, भरत ठाकूर, नितीन चव्हाण, मनीष मासोळे, मल्लखांब खेळाचे पंच भूपेंद्र मालपुरे, नेटबॉल जिल्हा संघटनेचे सचिव योगेश वाघ उपस्थित होते. या उन्हाळी क्रीडा शिबिरासाठी कबड्डी प्रशिक्षक जितेंद्र ठाकरे, स्केटिंग प्रशिक्षक धनंजय पाटील, बॉक्सिंग प्रशिक्षक भरत कोळी, फुटबॉल प्रशिक्षक अभिजित भामरे, मोसिम शेख, अॅथलेटिक्स प्रशिक्षक अमोल थोरात, प्रमोद पाटील, ज्युडो प्रशिक्षक संदीप बाविस्कर, हँडबॉल प्रशिक्षक निखिल मोरे, बास्केटबॉल प्रशिक्षक देवा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पंढरीनाथ बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन संंदीप बाविस्कर यांनी केले. आभार क्रीडाशिक्षक मनोहर चौधरी यांनी मानले.

मुलांना मैदानावर जाण्याची सवय लावावी
पालकांनी आपल्या मुलांना मोबाइल व इतर सोशल मीडियापासून दूर ठेवत त्यांना मैदानावर जाण्याची सवय लावली पाहिजे. तेव्हाचं त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होईल, त्याचबरोबर शहरात लहान वयोगटातील मुलांसाठी स्पोर्ट्स नर्सरीच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती रुजवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विविध उपक्रम क्रीडा प्रशिक्षकांनी राबवण्यासाठी प्रयत्न करावेत.
आसाराम जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी

शहरात क्रीडा संस्कृतीला चालना
उन्हाळी क्रीडा शिबिराच्या माध्यमातून शहरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार आहे, यात शंका नाही. या उन्हाळी शिबिराचा लाभ शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यावा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नावलौकिक करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
महेश घुगरी,अध्यक्ष जिल्हा क्रीडा महासंघ

बातम्या आणखी आहेत...