आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पंचायत समिती आवारात मोफत जलसेवा उपक्रम

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे कै. उमराव बोरसे यांच्या स्मृतीनिमित्त पंचायत समितीच्या आवारात मोफत जलसेवा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याचे जार ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती प्रा. विजय पाटील, गटविकास अधिकारी आर. डी. वाघ, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून या उपक्रमात खंड पडला होता. पंचायत समितीत ग्रामीण भागातून विविध कामांसाठी नागरिक येतात. त्यांना जलसेवेचा लाभ होणार आहे. या वेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी. के. पारधी, पी. टी. शिंदे, व्ही. बी. घुगे, एस.पी. विभांडिक, प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, विभागीय सचिव रवींद्र देवरे, जिल्हा कोषाध्यक्ष न्हानू माळी, जिल्हा प्रमुख संघटक कमलेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जिल्हा संघटक संजय ठाकूर, तालुकाध्यक्ष हनुमानदास बैरागी, सरचिटणीस डॉ.भागवत चौधरी, कोषाध्यक्ष अजय बच्छाव, ईश्वर बैसाणे, योगेश नेरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, सचिव ललित वाघ, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष वसईकर, अनिल सोनार, संजय पिंपळे, सुनील पाटील, सुधीर सोनवणे, विजय देवरे, सुनील वाडेकर, जितेंद्र कापडणीस आदी प्रयत्नशील आहे. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...