आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडित:शुक्रवारी सायंकाळी वादळी ; वादळाने शहाद्यात वीजपुरवठा खंडित

शहादा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सारंगखेडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांमुळे तापी नदीकाठावरील शहादा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शनिवारी सकाळपासूनच पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत शुक्रवारी सायंकाळी काही भागात जोरदार वादळी वारे वाहिले. त्याचा परिणाम तालुक्यातही जाणवला.

त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विजेचे खांब वाकले, मोठमोठी झाडे उन्मळून पडली. तसेच पाणीयोजनेचा वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे शनिवारी शहरात पाणीपुरवठा हाेऊ शकला नाही.सारंगखेडा येथील शहादा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला वीजपुरवठा हा सारंगखेडा वीज उपकेंद्रातून करण्यात आला. वादळी वाऱ्यांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे त्या-त्या वेळी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पालिका प्रशासनामार्फत युद्धपातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला. शहराला टप्प्याटप्प्याने सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रल्हाद पाटील यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...