आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:तीर्थक्षेत्र विकास निधीतून; पाच लाखांतून कापडण्यातील भवानी चौकात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भवानी चौकात ५ लाख रुपये खर्च करून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने तीर्थक्षेत्र विकास निधीतून हे काम होईल. या कामामुळे चौकातील अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघणार आहे. शहरातील भवानी चौकात नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात. त्यामुळे या चौकाचे काँक्रिटीकरण करावे किंवा या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात यावे, अशी मागणी सरपंच सोनीबाई भील, उपसरपंच महेश माळी, ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांनी गटनेते भगवान पाटील यांच्याकडे केली होती.

गटनेते भगवान पाटील यांनी विशेष पाठपुरावा करून आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी या कामासाठी निधी मंजूर करून आणला. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच सोनीबाई भील, उपसरपंच महेश माळी, ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी, उज्ज्वला माळी, नीलेश जैन, प्रवीण पाटील, भय्या माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भील, माजी पंचायत समिती सदस्य शरद माळी, धनूर येथील माजी उपसरपंच साहेबराव कोळी, महेंद्र पाटील, आनंद माळी, लक्ष्मण माळी, भरत माळी, देविदास सूर्यवंशी, गजू माळी, छोटू पाटील, निंबा माळी आदी उपस्थित होते. यापूर्वी शिवसेनेचे हिलाल माळी यांनीही पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी निधी दिला होता. आता आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांनी पाच लाखांतून उर्वरित काम मार्गी लागते आहे.

बातम्या आणखी आहेत...