आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:नवापुरात जुगार अड्ड्यावर धाड, 54 जणांवर कारवाई, रोख 7 लाखांसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

नवापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात एमआयडीसीमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर नाशिक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने गुरुवारी पहाटे साडेचार वाजता नंदुरबार पोलिसांच्या मदतीने छापा टाकला, त्यात ५४ जुगारींना झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना पकडले. त्यात ४६ जण गुजरातचे तर महाराष्ट्रातील १८ जणांचा समावेश आहे. त्यात ४ महिलाही आहेत. ३५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात राज्याच्या सीमेवर अवैध जुगार सुरू असल्याची माहिती नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांना मिळाल्याने यांच्या पथकाने छापा टाकला. त्यांच्याकडून रोख ७ लाख ५३ हजार ४० रुपये, चार ५२ पत्यांची कॅट ,५८ हजार रुपये किंमतीचे ९ मोबाइल फोन, २७ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ८ चारचाकी वाहने असा एकूण ३५ लाख ६१ हजार ४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले.

मोबाइल जप्त केले नाही आयजी पथकातील दोन अधिकारी, ७ कर्मचारी, नंदुरबार एलसीबीचे एक अधिकारी, चार कर्मचाऱ्यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली. बाहेर जेवढी चार चाकी वाहने होती तेवढी जमा केली. जुगार अड्ड्यावरील कामगारांचे ९मोबाईल जप्त केले आहेत. जुगाऱ्यांचे मोबाईल जप्त केले नाही. बापू रोहम, पोलिस निरीक्षक.

बातम्या आणखी आहेत...