आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:चितोडरोड अमरधाममध्ये गॅस शवदाहिनी लवकरच

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एकवीरादेवी मंदिराच्या मागील अमरधाममध्ये गॅस शवदाहिनीचे काम ७० टक्के झाले आहे. तसेच चितोड रोडवरील अमरधाममध्ये गॅसदाहिनी मंजूर असून या कामासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे.शहरातील अमरधाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यात येतात. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी अमरधाममध्ये गॅस शवदाहिनी बसवण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार देवपुरातील एकवीरादेवी मंदिराच्या मागे असलेल्या अमरधाममध्ये शवदाहिनीचे काम शहरातील अग्रवाल कुटुंबीयांकडून करून देण्यात येणार आहे. काही दिवसांपासून हे काम वेगात सुरू आहे. शवदाहिनीसाठी शेड उभारण्यात आले आहे. आता या ठिकाणी किरकोळ कामे शिल्लक आहे. त्यानंतर गॅस दाहिनी बसवली जाईल.

तसेच चितोड रोडवरही गॅस शवदाहिनी बसवण्यात येणार आहे. या कामासाठी फेरनिविदा काढावी लागली होती. आता निविदा प्राप्त झाल्या असून, पुढील आठवड्यात ठेकेदाराला कार्यादेश देण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. हे काम वेेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...