आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Gaurai Pujan To Akshayya Tritiya, The Practice Of Traditional Songs Is Maintained; Gauri Is Performed From House To House In Khandesh From Chaturdashi Of Chaitra Month |marathi News

दिव्य मराठी विशेष:अक्षय्य तृतीयेला गौराईपूजन, पारंपरिक गीतांची प्रथा कायम; चैत्र महिन्याच्या चतुर्दशीपासून खान्देशात घरोघरी केली जाते गौरीची मांडणी

तऱ्हाडी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशात अक्षय्य तृतीयेला मोठे महत्त्व आहे. या सणासाठी सासुरवाशिणी माहेरी येतात. त्याचबरोबर गौराईची पूजा बांधण्यात येऊन पूजन केले जाते. हातात टिपऱ्या घेऊन गाणे म्हणत गौराईची स्तुती केली जाते.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला खान्देशात वेगळे महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस (चावदस) खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली जाते. ग्रामीण भागात या सणाला खूपच महत्त्व आहे. सासुरवाशिणी या सणाला आवर्जून माहेरी येतात. गौराईला अहिराणीत “गवराई” आई म्हणतात. गौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. गौरी ही आर्यांची सौंदर्य देवता म्हणून मानली जाते. गौरी लाकडाची असते. दरवर्षी चैत्र महिन्याच्या चतुर्दशीपूर्वी गौरी स्वच्छ पाण्याने धुतली जाते. गौरीचा मुखवटा कोरलेले दोन छोटे दहा ते अकरा इंचाचे लाकडी भाग असतात. या लाकडाला खाली एक फळी दोन बारीक लाकडांच्या साह्याने जोडलेली असते. पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा करण्यापूर्वी गौराई ज्याठिकाणी मांडायची आहे ती जागा शुभ्र मातीने सारवून घेतली जाते. मुली व स्त्रिया सोयीनुसार नक्षी काढतात. त्याला गौरीचे घर म्हणतात.

पाट टाकूनही गौराई बसवतात. गौराईला बाशिंग बांधतात. रोज सकाळी गावातल्या सर्व कुमारिका व सासरहून आलेल्या मुली तांब्या व खाऊ घेऊन टिपऱ्यांच्या आवाजात नदीकडे जातात.तेथे जवळपासच्या गावातील मुलीही आलेल्या असतात. नदीच्या आल्याड- पल्याडच्या काठावर गाणे म्हटली जातात.

त्याला खान्देशात गौराईचे बार खेळणे म्हणतात. नदीतून किंवा नदीकाठी असलेल्या विहिरीवरून पाण्याच्या तांब्या भरून त्यावर आंब्याची पाच पान व एक कच्ची कैरी ठेवतात. त्याच डवणा म्हणतात. घरी आल्यावर आंब्याची कोवळी पाने गौराई पुढे ठेवतात. अशा पद्धतीने १५ दिवस म्हणजे अक्षय्य तृतीयेपर्यंत हा खेळ सुरू राहतो.

अशी केली जाते गौराईची पूजा
गौराईच्या पूजेत रोज वेगवेगळ्या पदार्थांची माळ असते. अक्षय्य तृतीयेच्या अगोदरच्या दिवशी सांजोऱ्या, करंज्या, कणकेच्या पुतळ्यांच्या माळा करून गौराईला घालतात. त्याच दिवशी मुली दोन पिवळे फडके करून ताटलीत धान्य घेऊन कुंभाराकडे जातात. कुंभाराकडे मातीच्या घोड्यावर एका मातीची मूर्ती असते. त्याच्यामागे डोक्यावर छत्री सारखे असते. त्याला शंकर असे म्हणतात. त्याला मुली घरी आणतात. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी मुली शंकर व गौराईला नदीवर नेतात. शंकराला नदीत टाकून गौराईला घरी आणतात. गौराई त्या दिवसापासून सासरी गेली असे समजतात.

या गाण्यांचे होते गायन
गौराईची गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. काही निवडक गाणी खान्देशांत प्रसिद्ध आहे. त्यात केशर झणझणनी, गौराईने माळ, कसाना भरी उना ताट, आथानी कैरी तथानी कैरी, गौरी पाणीले जाय आदी गीतांचा समावेश आहे. या गीतांचे गायन करून माहेरवाशीण आनंद व्यक्त करतात.

बातम्या आणखी आहेत...