आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:शहाद्यात गावरानी कैऱ्या दाखल; खरेदीसाठी गर्दी

शहादाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भाजी मार्केट परिसरात महिलावर्ग लोणचे तयार करण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या कैऱ्यांची धडगाव भागातून आवक झाली आहे. त्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. साधारण पहिला पाऊस झाल्यानंतर कैरीचे लोणचे टाकण्याचे वेध लागतात. त्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून वेगवेगळ्या कैऱ्यांची विक्री केली जात आहे. मात्र धडगाव भागातील सातपुडा पर्वतरांगांतील जळगाव भागातील गावरान कैऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होती.

आदिवासी बांधवांनी लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी आणल्या. रोज भाड्याच्या खासगी वाहनांनी या कैऱ्या आणल्या जातात. राजापुरी व धडगाव गावरानी कैऱ्या ५० रुपये तर साध्या कैऱ्या ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. शहरात बसस्थानकासमोर भाजी मार्केट, शासकीय विश्रामगृह परिसर व महाराणा प्रताप चौक जवळ कैऱ्यांची विक्री केली जात आहे. त्यासोबत त्याच ठिकाणी कैऱ्या फोडणाऱ्यांनी व्यवसाय सुरू केला असून १० रुपये किलो या दराने नागरिकांना कैऱ्या हव्या तशा फोडून मिळत आहेत.