आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तळोद्यातील बाजारात लोणच्यासाठी गावराण कैरी विक्रीला; रुचकर असल्याने मोठी मागणी

तळोदा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुड्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील खास कैरी बाजारात दाखल झाली असून शुक्रवारी शहराचा आठवडे बाजार आल्याने कैरी खरेदीसाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली. सातपुड्याच्या भागात माळ राणावर अस्सल गावरान कैरी असते. ती दळदार असल्याने लोणचे टाकण्यासाठी तिलाच अधिक मागणी असते. दरम्यान कच्ची कैरी फोडण्यासाठी विशेष मोठा अडकित्ता सारखा लाकूड व लोखंडचा बनलेल यंत्र वापरलं जात.

मात्र आता हळूहळू ते तंत्र मागे पडत असून ते फोडण्यासाठी लागणार कसब व शक्ती आता लावायला बहुतांश लोक आता बाजारात लोणचेसाठी आवश्यक गरजेनुसार तुकडे करून दिले जात आहेत. त्या कडे देखील अनेकांचा कल दिसून आला. घरगुती लोणचे तयार करण्यासाठी गावरान कैरीला पसंती असून या कैरीचे लोणचे टिकाऊ असते. बाजारात कैरी येण्यास प्रारंभ झाला आहे. यंदा अजूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाऊस पडल्यानंतर आणखी खरेदीस गर्दी होईल.

लोणचे झाले महाग
लोणच्यासाठी महागडा मसाला, तिखट, तेल, मिरची आदी वस्तू लागतात. त्यामुळे सध्यातरी लोणच्यासाठी अपेक्षित विक्री नाही. यंदा कैरी सर्वत्र असल्याने पाऊस पडताच लोणचं भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानुसार आतापासूनच नातेवाईकांना लोणचाच्या कैरीबाबत विचारणा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...