आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:सुवर्णपदक मिळवल्याने गीता राऊतचा‎ जिल्हा परिषद प्रशासनातर्फे झाला सत्कार‎

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील शासकीय‎ माध्यमिक आश्रमशाळेतील १७ वर्षे वयोगटातील खेळाडू‎ गीता शांताराम राऊतचा जिल्हा परिषदेतर्फे सत्कार झाला.‎ आश्रमीय क्रीडा स्पर्धांमध्ये गीताने बीट, तालुका, प्रकल्प,‎ जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर लांबउडीत सुवर्णपदक प्राप्त‎ केले. त्यामुळे तिचा सत्कार झाला. या वेळी जिल्हा‎ परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महिला व बालकल्याण‎ समिती सभापती संजीवनी सिसोदे, मुख्य कार्यकारी‎ अधिकारी बुवनेश्वरी एस आदी उपस्थित होते.

गीताच्या‎ यशाबद्दल प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी‎ तृप्ती धोडमिसे, मुख्याध्यापक सुभाष जाधव, प्रकल्प क्रीडा‎ समन्वयक विजय खैरनार, मनोज निकम, बालाजी उडतेवार,‎ चंद्रकांत साळुंखे, सोनी सूर्यवंशी, ज्योती अहिरे, पनालाल‎ पाटील, महाळू गांगुर्डे, विजय मारनर, अनिल राऊत, कैलास‎ बागुल, बनका बहिरम, पूजा देशमुख, महेश झुकले, अशोक‎ कुवर यांनी समाधान व्यक्त केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...