आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात अडीचशे बारव, 39 ठिकाणी जिओ टॅगिंग; 65 विहिरींची नावे आढळली

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने ऐतिहासिक पायविहिरींचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लळिंग येथे लोकसहभागातून पायविहिरीच्या पुनर्जीवनाचे काम सुरू झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागासह इतिहासाचे अभ्यासक, महाराष्ट्र बारव विहीर मोहिमेच्या स्वयंसेवकांनी १८८० मधील ब्रिटिशकालीन राजपत्र अभ्यासले. त्यात जिल्ह्यात प्राचीन पायविहिरी असल्याचा उल्लेख आहे. जिल्ह्यात किमान २५० बारव अस्तित्वात होत्या. त्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत चारही तालुक्यात ६५ विहिरींची नावे मिळाली आहे. त्यापैकी ३९ बारव अर्थात विहिरींची जिल्हा परिषद प्रशासनाने पाहणी करून जिओ टॅगिंग केले आहे. लोकसहभाग व शासकीय पातळीवर पायविहिरींच्या पुनर्जीवनाचे काम सुरू झाले आहे. लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पायविहिरीतून लळिंग ग्रामस्थ, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गाळ काढला जातो आहे. हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली राबवला जातो आहे.

लळिंगला काम सुरू : लळिंगची पायविहीर ५० ते ६० फूट खोल असल्याचा अंदाज आहे. पोकलॅण्डच्या मदतीने गाळ काढला जातो आहे. या कामाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सदस्य राम भदाणे, प्रा. अरविंद जाधव, धनंजय मंगळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. या वेळी प्रदीप पवार, लळिंगचे माजी सरपंच संभाजी गवळी, ग्रामपंचायत सदस्य बापू साने, आत्माराम सोनवणे आदी उपस्थित होते.

या विहिरींचे केले जिओ टॅगिंग
जिल्ह्यातील ३९ विहिरींचे जिओ टॅगिंग झाले आहे. त्यात शिरपूर तालुक्यात विखरण, अहिल्यापूर, वाघाडी, करवंद, चांदपुरी, धुळे तालुक्यात आंबोडे, नंदाणे, नंदाळे बु, शिंदखेडा तालुक्यात मेथी, रामी, तामथरे, वर्षी, विखरण, विरदेल, दसवेल, साक्री तालुक्यात आमळी, अंबापूर, भोनगाव, छडवेल, छाईल, चिंचपाडा, दापूर, धाडणे, ढवळीविहीर, दिघावे, डोमकानी, इंदवे, जैताणे, शिवखट्याळ, मैंदाणे, धनेर, म्हसदी प्र.नेर, पेरेजपूर, प्रतापपूर, शेलबारी, विरखेल, विटाई, भामेर, गणेशपूर येथील विहिरींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...