आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्टल:मनपाच्या पोर्टलवरून मिळवा घरबसल्या वेेळेत ऑनलाइन 57 दाखल्यांसह परवाने

नीलेश बत्तासे | धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत जन्म-मृत्यूच्या दाखल्यासह विवाह नोंदणी, फायर ऑडिटसह विविध प्रकारचे ना हरकत दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सारखे हेलपाटे मारावे लागतात. पण आता हा त्रास वाचणार असून, नागरिकांना मनपाच्या नगर कार्यावली या पोर्टलवरून घरबसल्या विविध प्रकारचे ५७ दाखले, परवाने मिळवता येतील. त्यासाठी ऑनलाइन शुल्क जमा करावे लागेल. ही प्रणाली नोव्हेंबरअखेर सुरू होईल.

महापालिकेच्या विविध विभागांचा कारभार काही वर्षांपासून संगणकीकृत होतो आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच नगररचना विभागात बांधकाम मंजुरीचे प्रस्तावही ऑनलाइन मंजूर होतात. दुसरीकडे नागरिकांना जन्म-मृत्यूपासून विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी महापालिकेत जावे लागते. अर्ज करून पैसे भरल्यावर ठरावीक दिवसाने दाखला मिळतो.

कर्मचारी जागेवर नसल्यावर दाखल्यासाठी हेलपाटेही मारावे लागतात. पण आता हा त्रास कमी होईल. कारण सर्व प्रकारचे दाखले ऑनलाइन देण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार महापालिकेने अॅसीन टेक कंपनीकडून नगर कार्यावली हे पोर्टल तयार करून घेतले आहे. या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केल्यावर विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळतील. त्यामुळे कागदपत्र जमा करण्यासाठी मनपात जाण्याची गरज नाही. शुल्कही ऑनलाइन जमा करावे लागेल. दाखलाही ऑनलाइन मिळणार आहे.

ग्रीव्हन्स पोर्टलवर करा तक्रार
१ नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही विभागातील कामकाजाविषयी तक्रार करावयाची असल्यास नगर कार्यावली पोर्टलमध्ये ग्रीव्हन्स पोर्टल असेल. या पोर्टलवर संबंधित विभागाची तक्रार आॅनलाइन नाेंदवता येणार आहे. हे पोर्टल बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

७ ते १५ दिवसांत मिळेल दाखला
२ पोर्टलवर अर्ज केल्यावर शासनाने ठरवून दिलेले शुल्क त्या-त्या दाखल्यासाठी भरावे लागेल. प्रत्येक दाखला किती दिवसांत मिळेल याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज केल्यावर ७ ते १५ दिवसात दाखले मिळतील, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

कसा मिळेल दाखला
नगर कार्यावली डॉट कॉम या पोर्टलवर गेल्यावर त्यात धुळे महापालिकेची निवड करावी. त्यानंतर विविध सेवाविषयक आयकॉन दिसतील. त्यावर क्लिक केल्यावर कोणत्या दाखल्यासाठी कोणती कागदपत्र जमा करावी लागतील याची माहिती दिसेल. ही कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतील. त्यानंतर ऑनलाइन शुल्क जमा करावे लागेल. शुल्क जमा करण्याचा पर्याय पोर्टलवर असेल. पैसे भरल्यावर दाखला कधी मिळेल याची तारीख लगेच दिसेल.

हे दाखले, परवाने मिळणार
जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी, फायर ऑडिट दाखला, मालमत्ता कर, पाणीपट्टी भरल्याचा दाखला, विविध प्रकारच्या परवान्यांमध्ये वाहतुकीचे साधने निर्मिती, दुरुस्ती व विक्रीसाठी आवश्यक परवाने, फेरीवाल्यांचा दाखला, खासगी वैद्यकीय सेवेचा दाखला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...