आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:गोवर प्रतिबंधक लस घेतली नसेल तर घ्या

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गोवरचे रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाते आहे. ज्या बालकांनी गोवर प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल त्यांनी ही लस महापालिकेच्या आरोग्य केंद्रात पालकांनी द्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख यांनी केले आहे.

शहरात गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे परिचारिका, आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन बालकांचे सर्वेक्षण केले जाते आहे. सर्दी, ताप, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसणाऱ्या बालकांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी. तसेच १ जानेवारी २०१७ नंतर जन्मलेल्या बालकांचे गोवर लसीकरण झाले आहे किंवा नाही हे पालकांनी तपासावे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत अचूक माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शहरात गोवर रुग्णांची संख्या सद्य:स्थितीत नियंत्रणात आहे.ही स्थिती असली तरी नागरिकांनी काळजी घेणेही आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...