आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शहाद्यात मुलींनी वाटप केल्या कागदी पिशव्या

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शारदा कन्या माध्यमिक विद्यालयाच्या बिग गाइडच्या विद्यार्थिनींनी वर्तमानपत्राच्या कागदापासून तसेच टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कागदी पिशव्या शहरात दुकानदारांना नंदुरबार जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या.शहरातील कटलरी, मेडिकल स्टोअर्स, कापड दुकाने, किरकोळ विक्रेते यांच्या दुकानांवर कागदी पिशव्या वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

यासाठी संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. कागदी पिशव्या वाटप करताना हिमांशू जाधव, मुख्याध्यापिका एस.झेड.सय्यद, पर्यवेक्षक एन.बी.कोते, सुनीता राठोड, पारखे, गावित उपस्थित होते. शासनाने सध्या प्लास्टिकबंदीबाबत जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे. त्यासंदर्भात जनजागृतीच्या माध्यमातून प्लास्टिकबंदी करून कागदी पिशव्या वापरण्याबाबत शारदा कन्या विद्यालयाच्या गाइडच्या विद्यार्थिनींनी मोहीम राबवल्याने कौतुक होत आहे. साधारणत: तीन हजार पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना शाळेत शिक्षिकांनी वर्तमानपत्र पासून कागदी पिशव्या बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...