आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:गीता, ज्योत्स्ना... वडिलांचे निधन; पण न खचता अभ्यास

कापडणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योत्स्ना... वडिलांचे निधन, स्वत: पोटाच्या आजाराने त्रस्त पण सोडली नाही उमेद

परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी वडिलांचे झालेले निधन झाले. घरची हलाखीची असलेली परिस्थिती, परीक्षा तोंडावर आल्यावर पोटाच्या विकाराने वर काढलेले डोके या सर्व संकटावर मात करून शहरातील डी. डी. विसपुते उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्योत्स्ना प्रवीण सैंदाणेने बारावीच्या परीक्षेत ८६.३३ टक्के गुण मिळवत यश मिळवले. ज्योत्स्ना नकाणे येथे राहते. तिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.

त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ज्योत्स्नाच्या आईवर येऊन पडली. आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी ज्योत्स्नाला पोटाचा विकार जडला. परिस्थितीत डगमगून न जाता ज्योत्स्नाने जिद्दीने अभ्यास करत परीक्षेत यश मिळवले. तिला प्रा. योगेंद्र पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. राजेश्री मासुळे, प्रा. राजेश्री बारी, प्रा. कुलदीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

गीता... वडिलांसह मामाचा मृत्यू पण न खचता अभ्यास
शहरातील गीता मालचे हिच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी तर तिच्या मामाचा गेल्यावर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला. गीता शिक्षणासाठी पाचवीपासूनच मामाकडे राहत असल्याने शिक्षणाचा सर्व खर्च मामा करत होता. मामाचा मृत्यू झाल्याने घराचा आधारच गेला. त्यानंतर काहीही सूचत नव्हते. शाळा, अभ्यासापासून गीता दूर होती. मात्र, मामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कोणालाही वडील, मामा गमवावे लागू नये यासाठी गीताने नर्स होण्याचा संकल्प केला. तो सिद्धीस नेण्यासाठी डोळ्यात तेल घालून एक महिना अभ्यासावर लक्ष केंद्रित करत बारावीच्या परीक्षेत यश मिळवले.

वडिलांची परिस्थिती जेमतेम असल्याने व नगाव-धमाणे येथे शिक्षणाची सोय नसल्याने गीता पाचवीपासून धुळ्यात गोंदूर रोडवरील इंदिरानगरात राहणाऱ्या मामाकडे शिक्षणासाठी होती. ती महाराणा प्रताप विद्यालयात विज्ञान शाखेला होता. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे मृत्यू झाला. त्यानंतर आई व दोन भावंडही मामाकडे आले. मात्र, गेल्या वर्षी मामाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शाळाही कोरोनामुळे बंद होत्या. कुटुंबात गीता, तिचे दोन भावंडे, आई, मामी, आजी आदी होते. गीताचा भाऊ व आईने काम सुरू केले. दुसरीकडे गीताने एक महिना अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दोन व रात्री एक तास तसेच दिवसभरात जमेल तसा अभ्यास करून शिकवणी न लावता तिने बारावी विज्ञान शाखेत ६६ टक्के मिळवले. एलआयसीचे अर्ज भरून देण्याचे काम करून हातभार लावते.

बातम्या आणखी आहेत...