आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शिंदखेड्यात गुणवंतांचा गौरव

शिंदखेडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या दोंडाईचा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला भारतीय आयुर्विमा महामंडळाला १ सप्टेंबर २०२२ रोजी ६६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. महामंडळातर्फे १ ते ७ सप्टेंबर दरम्यान विमा सप्ताह साजरा केला जातो आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्यानुसार जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते बारावीत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला.

महाविद्यालयाचे अध्यक्ष मनोहर पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष अमजद मेहमूद कुरेशी, खजिनदार देवेंद्र बोरसे, एलआयसीचे दोंडाईचा शाखाधिकारी संतोष कासार, सहायक शाखा अधिकारी दीपक बोरसे, विकास अधिकारी तुषार बोरसे, विमा प्रतिनिधी जितेंद्र मेखे, संचालक प्रा.जितेंद्र पाटील, प्राचार्या एम. डी. बोरसे, पर्यवेक्षक उमेश देसले, एस. एस. बैसाणे, डी.के. सोनवणे आदी उपस्थित होते. उपशाखाधिकारी दीपक बोरसे, विठोबा कचवे यांनी मनोगत व्यक्त केले. तुषार बोरसे यांनी आभार मानले. ए.टी. पाटील, डी.एच. सोनवणे, बी.जे. पाटील, जे.डी. बोरसे, ए.सी. मारनार यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...