आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:बेटावद येथे सुनेने केला सासूचा खून ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे कौटुंबिक कारणावरून संतप्त सुनेने सासूचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील पारसीपाडा येथील गणेश लाला बारेला ( वय २०) हा तरुण यशवंत महाजन यांच्या शेतात राखणदार म्हणून आहे. गणेश याने आपले कुटुंबीय देखील सोबत आणले होते. त्याच्या सोबत पत्नी भुरी, आई सियादीबाई हेदेखील होते; परंतु सियादीबाई यांना भुरी पावरा सतत त्रास देत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाददेखील होत असे. सायंकाळच्या वेळी दोघांमध्ये असाच वाद झाला. या वादानंतर संतप्त भुरी गणेश पावरा ( वय १९) हिने सासू सियादीबाई यांना दमदाटी व दांड्याने मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या सियादीबाई यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी गणेश पावरा याच्या तक्रारीवरून त्याची पत्नी भुरीबाई पावरा हिच्या विरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...